निंभोरा येथे पोस्टात तर रावेरला सफाई कर्मचा-याकडे घरफोडी

On: November 7, 2022 9:59 AM

जळगाव : गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात चो-या, घरफोड्या आणि मोटार सायकल चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. आता तर चक्क पोस्ट ऑफीसमधील पोस्टल ऑर्डर आणि तिजोरीच चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याशिवाय रावेर येथील सेवानिवृत्त सफाई कर्मचा-याच्या घरातून 95 हजार 400 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे.

निंभोरा येथील घटनेत 22 हजार 689 रुपये रोख, 980 रुपये किमतीच्या पोस्टल ऑर्डर आणि पाच हजार रुपये किमतीची लोखंडी तिजोरी चोरट्यांनी पळवली आहे. 5 व 6 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी उप डाकपाल प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास हे.कॉ.विकास कोल्हे करत आहेत.

रावेर येथील घटनेत सेवानिवृत्त सफाई कर्मचारी लक्ष्मण बाबू रिल यांच्या बंद घरातून 95 हजार 400 रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरुन नेला आहे. रावेर शहरातील रामदेव बाबा नगरात झालेल्या या घरफोडीचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment