जळगाव : सोन्याचे दागिने व रोख 52 हजार 500 रुपये असा एकुण 2 लाख 32 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द या गावी लोटू मुरलीधर पाटील हे 73 वर्षाचे वयोवृद्ध राहतात. त्यांच्या गुरुजी निवास या घरात 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घरफोडीत 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 52 हजार 500 रुपये रोख चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे स्वत: करत आहेत.