बसचा धक्का लागल्याने चालकास मारहाण, भडगावला परस्परविरोधी गुन्हे

जळगाव : बसचा धक्का लागल्याने संतप्त कथित समाजसेवकाने बस चालकास भडगाव बस स्थानकात गाठून शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बस चालकाने भडगाव पोलिस स्टेशनला कथित समाजसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर कथित समाससेवकाने बस वाहकाविरुद्ध गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रयत्न करत चारचौघात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

दत्तात्रय गणेश नाथबुवा हे बस चालक असून 7 नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी – मलकापूर बस घेवून जात होते. त्यांच्या ताब्यातील बसचा आपल्याला धक्का लागला असा नगरदेवळा येथील अण्णा सखाराम मोरे यांचा आरोप आहे. भडगाव स्थानकात बस आल्यानंतर अण्णा मोरे यांनी चालक दत्तात्रय नाथबुवा यांना कॉलर पकडून बाहेर ओढले.

मी कोण आहे तुला माहिती नाही, मी तुला पोलिस स्टेशनला दाखवतो असे म्हणत मोरे यांनी नाथबुवा यांना शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. गैरकायद्याची मंडळी जमा करुन मोरे यांच्यासह इतरांनी आपणास मारहाण केली. या घटनेत आपली 13 ते 14 हजार रुपयांची रक्कम जमीनीवर पडून गहाळ झाल्याची फिर्याद चालक नाथबुवा यांनी भडगाव पोलिस स्टेशनला दाखल केली. दरम्यान बस कंडक्टरने आपल्या गळ्यातील चेन बळजबरी हिसकावण्याचा प्रयत्न केला तसेच चारचौघात आपला अपमान केल्याची तक्रार अण्णा मोरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here