घराखाली असलेल्या गोडावूनमधून दागिन्यांची चोरी

On: November 9, 2022 10:59 AM

जळगाव : घराखाली असलेल्या गोडावूनच्या दरवाजाची कडी तोडून 30 वर्षापुर्वीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आली आहे. चोरीच्या या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील साईबाबा मंदीरासमोर सौ. मिरा आनंद पाटील या गृहीणी राहतात. त्यांच्या आईचे सुमारे तीस वर्षापुर्वीचे जुने सोन्या चांदीचे 58 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरी झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास हे.कॉ. वंदना पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment