ब्युटी पॉर्लर चालक महिलेशी जवळीक; किराणा दुकानदाराविरुद्ध गुन्हा

On: November 9, 2022 7:23 PM

जळगाव : ब्युटी पॉर्लर चालवणा-या महिलेसोबत अश्लिल वर्तन करणा-या किराणा दुकानदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सम्राट कॉलनी परिसरात एका महिलेचे ब्युटी पॉर्लर आहे. किराणा दुकानावर ती महिला वस्तू विकत घेण्याच्या निमीत्ताने गेली होती. त्यावेळी किराणा दुकानदाराने महिलेच्या हातांना पैसे स्पर्श केला तसेच गोड बोलून मोबाईल क्रमांक त्याने घेतला. याशिवाय तिचा वेळोवेळी पाठलाग केला.

महिलेच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम अ‍ॅपवर त्याने मेसेज टाकून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मोबाईलवरील स्टेटस माझ्यासाठी ठेवला आहे काय? असा 8 नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला मेसेज टाकला. या सर्व घटना महिलेने पतीच्या कानावर टाकत एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment