अकरा उसतोड मजुरांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

जळगाव : उसतोडणीसाठी प्रत्येकी तिस हजार रुपयांप्रमाणे अ‍ॅडव्हांस रक्कम घेतल्यानंतर कामावर येण्यास नकार देणा-या अकरा मजुरांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शिवाजी सोनवणे रा. वाखरी ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. उसतोडीच्या कामासाठी 7 ऑक्टोबर रोजी विशाल सोनवणे हे मजुरांना घेण्यासाठी तालुक्यातील जानवे या गावी आले होते. मात्र जानवे येथील सर्व अकरा मजुरांनी कामावर येण्यास नकार दिला.

त्यामुळे त्यांना प्रत्येकी तिस हजार रपये म्हणून दिलेली 3 लाख 30 हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स रक्कम परत मागितली. मात्र आज आमच्याकडे पैसे नसून आम्ही काही दिवसांनी देवू असे सर्व मजुरांनी विशाल सोनवणे यांना म्हटले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कैलास शिंदे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here