गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

On: November 9, 2022 9:07 PM

जळगाव : विनापरवाना गावठी कट्टा खरेदी करुन विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणा-या दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. छगन किसन कोळी आणि ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

25 हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा तसेच एक स्विफ्ट कार अशा 3 लाख 25 हजाराच्या मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. शिवाजी बाविस्कर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment