अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न – अमळनेरला गुन्हा दाखल

On: November 13, 2022 10:28 AM

जळगाव : अल्पवयीन मुलगी घरात झोपली असतांना तिचे तोंड दाबून तिला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द या गावी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी दोघा पिता पुत्रांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण साहेबराव पाटील आणि साहेबराव हरचंद पाटील दोघे रा. खेडी खुर्द प्र जळोद अशी दोघांची नावे आहेत.

आपल्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न होत असल्याचे बघून तिच्या आईने तरुणास प्रतिकार केला. मात्र अल्पवयीन मुलीच्या आई व आजीला मारहाण करुन तो पळून गेला. काही वेळाने भुषण व त्याचे वडील साहेबराव असे दोघे तेथे आले. त्या दोघांनी मिळून जातीवाचक गलिच्छ शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रावले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment