शनिवारी शाहरुख खान शारजाहवरून परत येत असताना त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले. त्याची चौकशी केली. सोशल मीडियावर याविषयी चांगलीच चर्चा रंगली. कस्टम ड्युटी न भरल्याने ही चौकशी करण्यात आली आहे असल्याचे सांगण्यात येत होते. एअर इंटेलिजेंस युनिटच्या सूत्रानुसार त्याच्याकडे महागडया घडाळ्यांची कव्हर्स होती. या वस्तूंची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. या वस्तूंचे कस्टम शुल्क ६. ८३ लाख रुपये आहे.
शाहरुख खान ४१ व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर या कार्यक्रमातून परतत होता तेव्हा हे सगळं घडल्याची चर्चा कालपासून होत होती. पण आता काही वेगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.
शाहरुखने कोणत्याही प्रकारचा दंड भरलेला नसून त्याने कायदेशीर पद्धतीने कर दिल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुख आणि त्याच्या टीमने ज्या वस्तु त्यांच्याबरोबर बाळगल्या होत्या त्यावर कर भरला आहे. त्यांनी कोणताही कर चुकवलेला नसून कोणताही दंड त्यांच्या आकारला नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियावर आलेल्या गोष्टींमध्ये आणि खऱ्या घटनेत बरीच तफावत आहे असं सांगण्यात आलं आहे.