“मेरी सेटींग लगानी पडेगी” म्हणत महिलेकडे शरिरसुखाची मागणी

On: November 14, 2022 10:25 AM

जळगाव : पाणीपुरीची गाडी लावणा-या महिलेस आपल्या चिकन विक्रीच्या दुकानावर बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सईद खाटीक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

सईद खाटीक या इसमाचे चिकन विक्रीचे दुकान आहे. त्याने पाणीपुरी विक्री करणा-या एका महिलेला आपल्या दुकानावर बोलावले. तुझ्याकडे सेटींग लावायची आहे. कुछभी करके मेरी सेटींग लगानी पडेगी असे म्हणत त्याने संबंधीत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस स्टेशनला सईद खाटीक याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारे विनयभंगाचा 354 (अ‍) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment