चोरीच्या मोटार सायकलींसह दोघांना अटक

On: November 14, 2022 4:28 PM

जळगाव : चोरीच्या दोन मोटार सायकलींसह दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशाल गोकुळ राजपुत आणि भुषण समाधान पाटील दोघे रा.अयोध्या नगर जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

अटकेतील दोघांकडून दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना. किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment