जिल्हा दुध संघ कार्यकारी संचालक लिमये यांच्यासह चौघांना अटक

On: November 14, 2022 9:47 PM

जळगाव : जळगाव जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहेकार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील संचालक विठ्ठल रुख्मिनी सोसायटी, मालक किशोर पाटील आणि तुप खरेदीदार अनिल अग्रवाल अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. दरम्यान या अटकेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी व सहका-यांनी या अटक सत्रात सहभाग घेतला. जिल्हा दुध संघात मध्यंतरीच्या कालावधीत राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त केले होते. मुख्य प्रशासक पदावर आ. मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य दहा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. विद्यमान संचालक मंडळाने या निर्णयाला न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. दरम्यानाच्या कालखंडात या प्रशासक मंडळाने कागदपत्रांची झाडाझडती घेऊन दुध संघात अपहार झाल्याचे शोधून काढले होते. यात दुध आणि लोणी यांच्या विक्रीत अपहार झाल्याची फिर्याद देण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment