दूध संघ अपहार प्रकरणी पाचवा संशयीत अटकेत

On: November 15, 2022 8:54 PM

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणातील पाचव्या संशयीतास अटक करण्यात आली आहे. जास्त किमतीचे तुप अतिशय कमी किमतीत विक्री केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याप्रकरणी काल 14 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार रवी मदनलाल अग्रवाल रा. अकोला यास अटक करण्यात आली आहे. रवी अग्रवाल याचा चॉकलेट कारखाना असल्याचे समजते. या गुन्ह्यातील चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील याच्या मदतीने रवी अग्रवाल यास अखाद्य तुप खाद्य म्हणून पुरवण्याचे काम केले जात होते. त्या अखाद्य तुपापासून चॉकलेट तयार करुन बालकांच्या जिवीताशी खेळ केला जात होता असे म्हटले जात आहे. दरम्यान अटकेतील सर्व संशयीतांना पाच दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. फरार चंद्रकांत पाटील याचा शोध सुरु आहे. आतापर्यंत एकुण पाच जणांना अटक झाली असून खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment