दूध संघ प्रकरणातील सहावा संशयीत अटकेत

On: November 16, 2022 2:25 PM

जळगाव : जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या तुप विक्री प्रकरणातील सहाव्या संशयीतास पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याला अयोध्या नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी व त्यांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत अटकेची कारवाई केली.

जास्त किमतीचे तुप कमी किमतीत विक्री केल्याच्या आरोपाखाली जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात काल अकोला येथील रवी मदनलाल अग्रवाल यास अटक केली आहे. रवी अग्रवाल हा अखाद्य तुपाचा वापर चॉकलेट तयार करण्यासाठी वापरुन आपल्या फायद्यासाठी बालकांच्या जीवाताशी खेळ करत होता. या प्रकरणी आतापर्यंत एकुण सहा संशयीत आरोपी अटक करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment