जळगाव : कर्जापोटी विश्वासाने ताबे गहाण करुन दिलेला प्लॉट बनावट कागदपत्राच्या मदतीने परस्पर विकल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिराबाई भिकन तायडे रा. दांडेकर नगर जळगाव यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
मिराबाई तायडे यांचा जळगाव शहरातील प्लॉट दोन लाख रुपये कर्जापोटी त्यांनी ताबेगहाण करुन दिला होता. प्लॉटवरील कर्जाची परतफेड मुकेश निंबाळकर व अनिल भोई (दोघे रा. जळगाव) यांच्यामार्फत करण्यात आली होती.
प्रदीप साहेबराव पाटील रा. मुसळी ता. धरणगाव यांनी तो प्लॉट परस्पर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सलमान भंगारवाला (रा. दांडेकर नगर जळगाव) यांना विक्री केल्याचे मिराबाई तायडे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. रविंद्र सोनार करत आहेत.