पत्नी व मुलीची छेडखानी केल्याचा राग मालकासह तिघांनी केली सालदाराची हत्या

On: August 14, 2020 2:08 PM

सोलापूर : पत्नी व मुलीची छेड काढणाऱ्या सालदाराची शेतमालकानेच हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील पांगरी येथे घडली आहे. पत्नीची वारंवार छेड काढणा-या सालदाराची चिडलेल्या बाप-लेकासह तिघांनी वायरने गळा आवळून हत्या केली. तिघा संशयित आरोपीतांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम नारायण कांबळे असे हत्या झालेल्या सालदाराचे नाव आहे. शिवाजी बोकेफोडे आणि रवी बोकेफोडे व चुलत मेहुणा आबा उर्फ राहुल माने अशी संशयीत आरोपितांची नावे आहेत.

मयत उत्तम कांबळे हा शिवाजी बोकेफोडे यांच्याकडे सालदार म्हणून कामाला होता. रात्री अकरा वाजता मासे पकडण्यासाठी सोबत चलण्याच्या निमित्ताने संशयितांनी मयताला घरातून गेले. त्यानंतर मयत उत्तम कांबळे परत आलाच नाही. संशयाच्या कारणावरुन उत्तम कांबळे याच्या परिवाराने शेतमालक शिवाजी बोकेफोडे यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

पोलिसांनी शिवाजी बोकेफोडे यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच खरा प्रकार समोर आला. मयत उत्तम कांबळे याची वायरने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीत टाकण्यात आला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment