जळगाव : जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील तुपाचा मामला मोठ्या प्रमाणात उघड होत असून पोलिस तपासाची चक्रे वेगाने फिरत आहे. सत्ताबदल झाल्यानंतर बेकायदा तुप विक्रीचे प्रकरण उघड झाले आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरवर्षी मेरीटमधे उत्तीर्ण होणारा विद्यार्थी मास्तर बदलताच अचानक नापास कसा काय झाला? अशा स्वरुपाचा हा प्रकार सत्तापालट होताच उघड झाल्याचे म्हटले जात आहे. अर्थात सत्ताबदलापुर्वी दूध संघात बिनबोभाट गैरव्यवहार सुरु होता आणि विद्यार्थी मेरीटमधे पास होत असे.
दूध संघाच्या वतीने शैलेश मोरखडे यांनी याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरु आहे. दूध संघातून घेतलेले तुपाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे परिक्षणासाठी पाठवले जाणार आहेत. अकोला येथील अग्रवाल यास हरी पाटील यांनी विकलेल्या साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे म्हटले जात आहे.