जळगाव : दहा लाख रोखीसह सोन्याचे दागिने असा एकुण 15 लाख 19 हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप चैनीसिंग राठोड रा. बोढरे (लहान) यांनी चोरीप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक 16 व 17 नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान संदीप राठोड यांच्या बोढरे येथील घरात अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी सहायक पोलिस अधिक्षक अभय सिंग यांच्यासह पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेटी दिल्या आहेत. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक लोकेश पवार करत आहेत.