मुंबई : महाराष्ट्राचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक परिक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020 मधे झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या, एटीकेटीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे. या परीक्षांचे संभावित वेळापत्रक देखील मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा 6 ऑक्टोबरपासून होणार आहेत.
इयत्ता दहावीची परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबर दरम्यान, बारावीची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबर दरम्यान तसेच व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर दरम्यान, दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान, तसेच बारावीची प्रात्याक्षिक, लेखी आणि श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे.
या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात काही अभिप्राय, सूचना अथवा दुरुस्ती असल्यास ती 17 ऑगस्टपर्यंत ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्याच्या सूचनाही मंडळाने दिली आहे. यासाठी मंडळाने [email protected] हा ई-मेल आयडी देखील दिला आहे.