जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकाने दोघा मोटार सायकल चोरट्यांना चोरीच्या तिन मोटार सायकलींसह अटक केली आहे. गणेश उर्फ घनशा शिलदार बारेला (24) रा. कर्जाणा ता.चोपडा व लखन उर्फ टारझन सुरेश बारेला (22) रा. अजगिऱ्या ता.वरला जि.बडवाणी मध्यप्रदेश अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
गणेश बारेला आणि लखन बारेला हे दोघे चोरीच्या मोटारसायकली चोपडा शहर व परिसरात वापरत असल्याची गोपनीय माहिती पो.नि.किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार पोहेकॉ. सुरज मधुकर पाटील, पोना. परेश प्रकाश महाजन, पोना. रविंद्र रमेश पाटील, पोना राहूल मधुकर बैसाणे, पोकॉ. दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकॉ. प्रमोद शिवाजी ठाकूर आदींचे एक पथक तयार करण्यात आले होते. चोपडा तालुक्यातील कर्जाणा गावात सापळा रचून दोघांना शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली.
चोपडा शहर व नाशिकच्या सातपुर परिसरातून आपण मोटार सायकल चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील तपासकामी दोघांना चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.