जळगाव : पेट्रोल पंपावरील चार झोनल मशिनचे स्टॅंपींग करुन चौघा मशिनचे प्रमाणपत्र देण्याकामी प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांची लाच स्विकारणा-या वैधमापन निरीक्षकास एसीबी पथकाने ताब्यात घेण्याची घटना 22 नोव्हेंबर रोजी घडली. विवेक सोनु झरेकर असे एसीबीच्या जाळ्यात आलेल्या पाचोरा येथील वैधमापन निरिक्षकाचे नाव आहे.
जामनेर तालुक्याच्या पहुर येथील तक्रारदाराच्या पेट्रोल पंपावर चार झोनल मशिन आहेत. चौघा झोनल मशिनचे स्टॅंपिंग करुन प्रमाणपत्र देण्याकामी विवेक झरेकर यांनी पेट्रोलपंप मालकास सहा हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान आलेल्या तक्रारीनुसार जळगाव एसीबी पथकाने रचलेल्या सापळ्यात लाचेची रक्कम घेतांना विवेक झरेकर सापडले. पहुर ते जळगाव दरम्यान रस्त्यावरील हॉटेल अजिंक्य येथे हा सापळा रचण्यात आला होता.
सापळा व तपास अधिकारी पोलिस उप अधिक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या पथकातील सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक एस.के.बच्छाव, एन.एन.जाधव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे आदींनी या सापळा कारवाईत सहभाग घेतला.