जळगाव : तरुणाला आलेल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याच्या नकळत अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग पलीकडून बोलणा-या मोबाईलधारकाने केली. सदर व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल न करण्यासाठी धमकी देत तरुणाकडून वेळोवेळी 1 लाख 39 हजार 740 रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळण्यात आली. या घटनेप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील खडका येथील तरुणाच्या बाबतीत हा प्रकार झाला आहे. खडका येथील 32 वर्ष वयाच्या तरुणाला 21 व 22 नोव्हेंबरच्या कालावधीत पलीकडून व्हाटसअअॅप कॉल आले. पलीकडून बोलणा-याने आपण यु ट्युब अधिकारी आणि क्राईम बॅंच अधिकारी असल्याचे भासवून तरुणाला घाबरवण्याचा प्रकार केला. हे व्हिडीओ व्हायरल न करण्याची धमकी देत त्याच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन 1 लाख 39 हजार 740 रुपये उकळले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.





