फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने केला दागिन्यांचा अपहार

जळगाव : हातचलाखीने लॉकरच्या चाव्यांची अदलाबदल करुन फायनान्स कंपनीतील सुमारे साठ लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरात मनप्पुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय असून त्याठिकाणी विशाल दिननाथ रॉय हा तरुण शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. विशाल रॉय याने सहायक ब्रॅंच मॅनेजर सागर बंडू झाडे याच्या जवळ असलेल्या लॉकरच्या चाव्यांची हातचलाखीने अदलाबदल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाव्यांची अदलाबदल केल्यानंतर 20 नोव्हेंबरच्या सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीच्या कार्यालयात प्रवेश करुन लॉकरमधील 60 लाख 81 हजार 830 रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा अपहार करुन पळून गेल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरिया मॅनेजर अनिकसिंह सत्येंद्र किशोरसिंह (30) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल अपहाराच्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. घटनास्थळाला डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पो.नि. गायकवाड व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here