तलवारींच्या बळावर दहशत माजवणा-यास अटक

On: November 24, 2022 3:09 PM

जळगाव : तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारींसह अटक केली आहे. समीर समशेर तडवी (रा सुप्रीम कॉलनी जळगांव) असे अटक करण्यात आलेल्या विस वर्षाच्या तरुणाचे नाव आहे.

अवैध शस्त्र बाळगणा-यांविरुद्ध मोहिम राबवण्याचे आदेश पोलिस अधिक्षक एम.राजकुमार आणि अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ दिपक पाटील, पोना किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी आदींच्या पथकाने सुप्रिम कॉलनी परिसरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे समीर तडवी यास दोन तलवारींसह अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment