कोंबींग ऑपरेशन दरम्यान दोघे हद्दपार आरोपी ताब्यात

On: November 24, 2022 6:25 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी कोंबींग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील दोघा हद्दपार आरोपींना ताब्यात घेतले आहे. हद्दपारीची कारवाई झाली असतांना देखील रेकॉर्डवरील दोघे आरोपी शहरात फिरतांना पथकाला आढळून आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या अख्यतारीतील हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बावीस्कर, विजय पाटील, प्रितम पाटील यांच्या पथकाने सुनिल उर्फ लखन भगवान सारवान (रा. गुरुनानक नगर जळगाव) यास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुस-या पथकातील हे.कॉ. सुरज पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर आदींनी समाधान हरचंद भोई (रा. खंडेराव नगर जळगाव) यास ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द रामानंदनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment