घरफोडी, दुकानफोडी करणा-या दोघांना अटक

जळगाव : घरफोडी, दुकानफोडी तसेच विद्युत पोलवरील अल्युमिनीयमच्या तारा चोरणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली आहे. शेख शकिल शेख सलीम रा. पंचशिल नगर, भुसावळ व शेख आसिफ शेख अकबर रा. मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

यावल पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणारे दोघे भुसावळ शहरातील रहिवासी असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे आपल्या गुन्हे शोध पथकाला त्यांनी भुसावळ येथे रवाना केले होते. गुन्हे शोध पथकाने माग काढत शेख शकिल आणि शेख आसिफ शेख या दोघांना बस स्टॅंड परिसरातून ताब्यात घेत अटक केली. त्यांनी यावल, पहुर आणि एमआयडीसी जळगाव हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली पथकाला दिली.

घरफोडीचे गुन्हे करतांना आपल्यासमवेत वसिम अहमद पिंजारी, चॅम्पीयन श्याम इंगळे (दोघे रा. पंचशिल नगर, भुसावळ), श्याम सुभाष शिरसाट ऊर्फ अब्दुल गफ्फुर रा. पापा नगर, भुसावळ, आवेश अहमद पिंजारी रा. पंचशिल नगर, भुसावळ यांचा देखील सहभाग असल्याची अटकेतील दोघांनी कबुली दिली आहे. पुढील तपासकामी दोघांना यावल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक शांताराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. घरफोडीचे अजून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here