तलावात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

On: August 14, 2020 6:33 PM

जळगाव : मित्रांसोबत मेहरुण तलावावर फिरायला गेलेला तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना बुधवारी घडली होती. आज तिस-या दिवशी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. साईनाथ शिवाजी गोपाळ (22) रा.धामणगाव वाडा, समता नगर असे पाण्यात आढळलेल्या तरुणाचे नाव आहे.

12 ऑगस्ट रोजी साईनाथ हा त्याचे नातेवाईक ज्ञानेश्वर अर्जुन गोपाळ व मित्र सोनू सुरेश गोपाळ अशांसोबत मेहरुण तलावावर गेला होता. रात्री उशिरापर्यंत साईनाथ घरी परत आला नाही म्हणुन त्याच्या परिवाराने त्याचा शोध घेतला. मात्र तो घरी परत आला नाही. साईनाथ सोबत तिघे जण मेहरुण तलावावर गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथे त्याचा तपास केला.

तलावाच्या किनारी त्याचे कपडे मिळून आले. त्यामुळे त्याच्या परिवारातील सदस्य पोलिस स्टेशनला गेले. मात्र, अंधार असल्याने काही उपयोग झाला नाही. दरम्यान आज मयत साईनाथचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment