मलायका अरोरापासून वेगळा झाल्यापासून तिचा पती अरबाज खान याने जॉर्जिया एंड्रियानी हिच्यासोबत प्रेमसंबंध सुरु केले आहे. अरबाज आणि जॉर्जीया यांच्यात बावीस वर्षाचे अंतर आहे. अरबाज खान आणि जॉर्जीया गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सन 2018 मधे दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.
गर्लफ्रेंड जॉर्जीया हिने अरबाज खान सोबतच्या रिलेशनबद्दल नेहमीच मौन बाळगले आहे. मात्र एका मुलाखतीदरम्यान तिने अरबाज खान सोबतच्या नात्याचा खुलासा केला. अरबाज खान याची पुर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरा हिच्यासोबत तिचे नाते कसे आहे याबाबत तिने भाष्य केले.
या मुलाखतीत जॉर्जियाला “तू मलायका अरोराला भेटली आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “मी अनेकदा तिला भेटले आहे. मला ती खूप आवडते. तिचा आतापर्यंतचा प्रवास खूपच कौतुकास्पद आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात शून्यापासून केली होती. ती एक मॉडेल होती आणि हळूहळू ती तिला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचली. आज ती त्या ठिकाणी आहे जिथे असण्याची तिची सुरुवातीपासूनच इच्छा होती. त्यासाठी मी तिला सॅल्यूट करते. माझ्यासाठी ती अशी स्त्री आहे जिचं मी खरंच कौतुक करू शकते.”