शिल्पा शेट्टीने मुंबईत सुरु केला नवीन कॅफे

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. कधी योगा, तर कधी वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या शिल्पाला सतत नवीन काहीतरी करून बघण्याचा ध्यास आहे. आता तिने सोशल मिडीयावरून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

शिल्पा शेट्टी सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. याचं कारण तिने मुंबईत सुरु केलेला नवीन कॅफे हे आहे. बॉलिवूडमध्ये काम करताना उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणारी शिल्पा पहिलीच अभिनेत्री नाही. याआधी प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, सलमान खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान, आदित्य पांचोली, आमिर खान यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये त्यांचं नशीब आजमावलं आहे. या यादीत शिल्पा शेट्टीचंही नाव टॉपमध्ये आहे. तिचं मुंबईत आधीच एक रेस्टॉरंट होतं आणि आता ती आणखी एका कॅफेची मालकीण झाली आहे. या तिच्या नव्या कॅफेचं नाव आहे ‘संडे बिंज.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here