लाठ्या, काठ्या, तलवार, बंदूकीचा वापर – सावद्यात चाळीस जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : कत्तलखान्यानजीक गुरांची गाडी आल्याचे समजल्याने ती बघण्यासाठी आलेल्या मुलांना सुमारे चाळीस जणांनी लाठ्या, काठ्या, तलवार आणि बंदुकीच्या मागील बाजूने मारहाण केल्याची घटना सावदा शहरात 28 नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेप्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील कत्तलखान्यानजीक गुरांचे वाहन कत्तलीसाठी आल्याचे समजल्याने गावातील काही मुले घटनास्थळी गेले होते. त्यावेळी एका समुदायाची मुले त्यांना मारहाण करत असल्याचा निरोप जितेंद्र किसन भारंबे यांना मिळाला. या घटनेची शहानिशा करण्यासाठी जितेंद्र भारंबे घटनास्थळी गेले असता बिलाल कुरेशी नामक इसमाने त्यांच्या डोक्यास बंदूक लावून बंदूकीच्या मागील भाग त्यांच्या तोंडावर मारला. अशपाक कुरेशी याने त्यांच्या पाठीमागून येत त्यांच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले. भारंबे खाली जमीनीवर पडताच बिलाल आणि अशपाक यांच्यासोबत असलेल्या सुमारे तिस ते चाळीस जणांनी हातातील लाठ्या काठ्यांनी अंगावर मारहाण सुरु केली.

जखमी जितेंद्र भारंबे यांच्यावर फैजपूर येथील श्री हॉस्पीटल येथे वैद्यकीय उपचार सुरु असतांना त्यांनी या घटनेप्रकरणी बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कादीर कुरेशी व इतर सुमारे तिस ते चाळीस जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या घटनेतील 9 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here