भुसावळच्या डॉ. खानापूरकर यांच्याविरुद्ध गुन्हा

On: November 30, 2022 12:30 PM

जळगाव : वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्याने नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी भुसावळ येथील बालरोगतज्ञ डॉ. उमेश खानापूरकर आणि डॉ. समीर खानापूरकर या दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी समीतीत हलगर्जीपणा उघड झाल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील रहिवासी रंजना शैलेंद्र देशमुख (रा. पाटील मळा भुसावळ) यांचा नऊ महिने वयाच्या चेतायू देशमुख या बालकावर डॉ. खानापूरकर यांच्या दवाखान्यात 31 ऑक्टोबर 2017 ते 9 नोव्हेंबर 2017 या कालावधीत उपचार सुरु होते. उपचारात हलगर्जीपणा झाल्याने या बालकाचा मृत्यू ओढवला. पाच वर्षानंतर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.

बालकाच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा डॉक्टरांविरुद्ध गु.र.न. 553/22 भा.द.वि. 304 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment