टोळीने गुन्हे करणारे तिघे जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

On: December 5, 2022 9:27 PM

जळगाव : टोळीने राहून गुन्हे करणा-या रावेर येथील तिघांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जावेद शेख लुकमान, सादिक शेख लुकमान व सद्दाम शेख लुकमान अशी हद्दपार करण्यात आलेल्या रावेर येथील तिघा तरुणांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव करण्यात आला होता.

मुंबई पोलिस कायदा कलम 55 नुसार या तिघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या प्रस्तावावर प्रशासकीय पातळीवर कारवाई करण्यात आली. हद्दापारीचा प्रस्ताव करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

टोळीने राहून रावेर शहर व परिसरात दहशत पसरवण्याची या टोळीची पद्धत असून नागरिकांमधे या टोळीची दहशत पसरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हद्दपार करण्यात आलेल्या तिघांच्या वर्तनात सुधारणा व्हावी या उद्देशाने त्यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment