अल्पवयीन मुलीस केले गर्भवती – तरुणाविरुद्ध गुन्हा

On: December 8, 2022 11:15 AM

जळगाव : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील ओळखीचा गैरफायदा घेत शरीरसंबंधातून तिला गर्भवती करणा-या तरुणाविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्की पंढरीनाथ कोळी रा. नांदेड ता. धरणगाव असे बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा नोंद करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यापुर्वी धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीसोबत विक्की कोळी याने तिच्यासोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या संबंधातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार विक्की याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment