जळगावच्या तरुणीचे बळजबरी लग्न लावण्यासाठी अपहरण

On: December 8, 2022 3:47 PM

जळगाव : बळजबरी लग्न करण्याच्या उद्देशाने तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी विविध कलमाखाली बारा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणा-या विस वर्षाच्या पिडीत तरुणीने रामानंद नगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादींनुसार बळजबरी लग्न करण्याच्या उद्देशाने आपले अपहरण केल्याचे म्हटले आहे. आपल्याला गुंगीचे औषध पाजुन एका खोलीत डांबून ठेवल्याचे देखील पुढे म्हटले आहे.

सागर इश्वर राणा, इश्वर गोपाल राणा, गायत्री इश्वर राणा तिघे रा. तोफखाना रोड अहमदनगर, पल्लवी सुनिल राणा पुणे, सुरज किकेलिया इंद्रप्रस्थ नगर जळगाव, शिवम राणा अहमदनगर, संगिता सुभाष राणा, सुभाष मोहन राणा, श्वेता शिवम राणा सर्व रा. अहमदनगर, प्यारे भैय्या, प्यारे भैय्याची पत्नी व एक अज्ञात कार चालक अशी सर्व संशयित आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment