दहा हजार रुपयांची लाच – सहकार निबंधक अधिकारी ताब्यात

On: December 9, 2022 4:30 PM

जळगाव : अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्याकामी तसेच नाशिकच्या अपिलात मदत करण्याकामी दहा हजार रुपयांची मागणी व स्विकार करणा-या सहकार निबंधक कार्यालयातील सहायक अधिका-याला जळगाव एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शशिकांत नारायण साळवे असे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या अधिका-याचे नाव आहे.

शुक्रवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास सहकार निबंधक कार्यालयातच हा कारवाईचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली होती. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment