कपाशीचे गाठोडे व मोटार सायकल चोरट्यांना मुद्देमालासह अटक

On: December 10, 2022 10:03 PM

जळगाव : एक क्विंटल कपाशीचे गाठोडे चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले एक क्विंटल कपाशीचे गाठोडे जप्त करण्यात आले आहे. विशाल नामदेव पवार आणि रविंद्र नगराज कोळी दोन्ही रा. शिरुड ता.जिल्हा धुळे असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुस-या घटनेत पारोळा बस स्थानक परिसरातून चोरी गेलेल्या मोटार सायकलचा शोध लावण्यात आला असून दोघा मोटार सायकल चोरट्यांना देखील अटक करण्यात आली आहे. विभोर जुलाल जाधव रा. जवखेडा ता. एरंडोल व त्याचा साथीदार प्रवीण संभाजी पाटील रा. ब्राह्मणे ता. एरंडोल अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

पारोळा न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आलेला चोरीचा कापूस आणि मोटार सायकल मुळ फिर्यादीस परत देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक योगेश जाधव, प्रदीप पाटील, पो. कॉ. किशोर भोई, राहुल कोळी, अभिजित पाटील, आशिष गायकवाड, हेमचंद्र साबे, राहुल पाटील, पोलिस नाईक संदीप सातपुते, महिला पोलिस नाईक आम्रपाली पालवे आदींनी या गुन्ह्याच्या शोधकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment