तरुणाची जळगाव येथे आत्महत्या

On: August 15, 2020 12:13 PM

जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील एका शेतात तरुणाने झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. कुणाल मैकूलाल पाली (28) असे आत्महत्या करत जीवनयात्रा संपवणा-या तरुणाचे नाव आहे. मयत कुणाला पाली हा मुळचा यवतमाळ येथील रहिवासी असून तो सध्या मेहरुण भागात रहात होता.

आज सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा होवू शकला नाही. कुणाल पाली हा विशाल नाईक यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होता. त्याच्यासमवेत त्याचे वडील मैथुलाल, आई रेखा व भाऊ सुनील असे रहात होते. .या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास महेंद्र गायकवाड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment