जळगाव : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे १३ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात साहित्य कला पुरस्कारांचे वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुसरा व्दिवार्षिक कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांना दिला जाणार आहे.
कवयित्री बहिणाई पुरस्कार संध्या नरे-पवार (कुलपवाडी), बालकवी ठोंबरे पुरस्कार वर्जेश सोलंकी (आगाशी), ना. धों. महानोर पुरस्कार प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना तर पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, ज्योती जैन यांनी ही निवड केली आहे.