पत्रकारावर हल्ला – चाळीसगावला दोघांविरुद्ध गुन्हा

On: December 17, 2022 11:02 AM

जळगाव : दै. भास्करचे चाळीसगाव येथील प्रतिनिधी तथा आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे (ऑल इंडिया पत्रकार संघटना) महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव सूर्यकांत कदम यांच्यावर दि. 15 डिसेंबर 2022 रोजी दोघांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायतचे उप सरपंच सिद्धार्थ मोरे व त्याचा भाऊ रविंद्र मोरे या दोघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1-15 वाजेच्या सुमारास चाळीसगाव पंचायत समितीच्या गेटसमोर शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याची धमकी व हल्ल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केल्यास खंडणीचा व इतर कोणताही गुन्हा दाखल करू अशी धमकी यावेळी पत्रकार सुर्यकांत कदम यांंना देण्यात आली. दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली असली तरी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कदम यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्यासह पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की दि 15 डिसेंबर रोजी पत्रकार सुर्यकांत कदम हे चाळीसगाव पंचायत समिती समोरुन जात असताना पिंपरखेड ता. चाळीसगाव येथील ग्रामस्थांनी त्यांना बातमीचे निवेदन दिले. ते निवेदन घेऊन ते पंचायत समितीमध्ये जात असताना रवींद्र दिलीप मोरे रा पिंपरखेड ता चाळीसगाव याने त्यांच्या अंगावर येऊन माझ्याकडे ताठ का बघतो म्हणून माझ्याशी खेटू नको असे म्हणून हुज्जत घालत शिवीगाळ सुरु केली. तू आमच्या विरोधात बातम्या छापतो का? तुझे हातपाय तोडतो, तुला मारून टाकेन असे म्हटला. तेव्हा त्याचा भाऊ ग्रामपंचायत उपसरपंच सिद्धार्थ मोरे याने अंगावर धावून येत तुला जिवंत सोडणार नाही, तू पत्रकार असला तरी आम्ही पत्रकारांना घाबरत नाही. तुला ज्या बातम्या छापायाच्या त्या छाप असे म्हणून झटापटी करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर आम्ही ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहोत.

दोघे भाऊ आडदांड व खुनशी असून कदम यांच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास त्यास रवींद्र मोरे व सिद्धार्थ मोरे हे जबाबदार राहतील असे म्हणत दोघांवर पत्रकार संरक्षण कायदा व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट 1932 चे कलम 7 (1) (a) नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने देशभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment