जळगावला खूनाची घटना – एक ठार, दोघे जखमी

On: December 20, 2022 8:44 PM

जळगाव : जळगाव शहरात आज सायंकाळी खूनाची घटना घडली असून सामान्य रुग्णालयात हत्या झालेल्या व जखमी तरुणांच्या शोकमग्न नातेवाईकांचा आक्रोश दिसून आला आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनीपेठ हद्दीतील आकाश उर्फ धडकन सपकाळे या तरुणाची चित्रा चौक परिसरातील देशी दारु दुकानानजीक हत्या झाली असून त्याचे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. जुन्या वादातून हा हत्येचा प्रकार झाला असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर पोलिस स्टेशन आदींचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पथक सामान्य रुग्णालयात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रवाना झाला. अण्णा सैंदाणे व त्याचा भाऊ गोपाल सैंदाणे नावाच्या तरुणांनी हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. परिसरात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment