पोलीस जलतरण तलावाच्या खेळाडूंची मिनी ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड

जळगाव : चौथी राज्यस्तरीय मॉडर्न पेंटाथलॉन स्पर्धा व मिनी ऑलम्पिक पात्रता स्पर्धा बालेवाडी क्रीडा संकुल येथे दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाली या स्पर्धेत प्रथम धावणे नंतर शूटिंग व जलतरण असे तीन प्रकार होते. या स्पर्धेत जळगाव पोलीस जलतरण तलाव येथील आठ जलतरणपटूंनी भाग घेऊन स्पर्धेत खालील प्रमाणे यश मिळवले आहे.

19 वर्षाखालील मुले : तलाह सिद्दिकी चौथ्या स्थानी, अमेय नगरकर पाचव्या स्थानी, हर्षवर्धन महाजन आठव्या स्थानी, आयान शेख नवव्या स्थानी. 19 वर्षाखालील मुली : धनश्री जाधव पाचव्या स्थानी. 17 वर्षाखालील मुले : ओम चौधरी तृतीय स्थानी. 17 वर्षाखालील मुली : लाजरी खाचणे चौथ्या स्थानी, जानवी महाजन पाचव्या स्थानी.

वरील सर्व जलतरणपटू यांची पुढील महिन्यात बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या मॉडर्न पेंटाथलॉन ऑलम्पिक स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे तसेच मिनी ओलंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या संघास प्रशिक्षक म्हणून जयंत चौधरी, सुरज दायमा टेक्निकल ऑफिशियल म्हणून कमलेश नगरकर यांची  निवड करण्यात आलेली आहे. यश मिळवलेल्या खेळाडूंचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ सुनंदा पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here