समाजात दहशत माजवणारे सात आरोपी जळगांव जिल्ह्यातून हद्दपार

On: December 21, 2022 8:06 PM

जळगाव : समाजात दहशत माजवणा-या सात आरोपींना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले  आहेत. शरीराविरुध्द आणि मालाविरुध्द गुन्हे करुन समाजात दहशत माजवणारे सात आरोपी जळगावच्या रामानंद नगर  पोलिस स्टेशन हद्दीसह सावदा आणि रावेर तालुक्यातील आहेत.

रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल भिका कोळी (रा. पिंप्राळा जळगांव) यास दोन वर्षांसाठी तसेच सावदा पोस्टे. हद्दीतील सैय्यद ईकबाल उर्फ सैय्यद भुऱ्या अल्लाऊद्दीन रा. रविवार पेठ सावदा, शे. रईस उर्फ मास शेख ईस्माईल रा.गाशिया नगर सावदा, शे. जाबीर शे. खलील रा. ख्वाजा नगर सावदा, रावेर पोस्टे. हद्दीतील विनोद विठ्ठल सातव रा. रावेर, तुळशिराम सुभाष सावळे रा. कर्जोद ता. रावेर व निंभोरा पोस्टे. हद्दीतील सुनिल श्रावण चव्हाण रा. ऐनपूर ता. रावेर यांचा त्यात समावेश आहे.

सर्वांना प्रत्येकी एक वर्ष कालावधीसाठी जळगांव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सफौ. युनूस इब्राहीम शेख, पोहेकॉ. सुनिल दामोदरे, पोना. रविंद्र रमेश पाटील आदींनी या  कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment