नाशिकला घरफोडी ; सव्वा लाखाचा ऐवज चोरी

On: August 15, 2020 7:41 PM

नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद रस्त्यावर उदयनगर परिसरातील बंद बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरुमच्या कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व तेवीस हजार रुपयांची रोकड चोरुन नेला. हा सर्व मुद्देमाल जवळपास सव्वा लाख रुपयांचा आहे. घरफोडी केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर म्हसरूळ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार ते गुरुवार दरम्यान घरफोडीची ही घटना घडली आहे. घरफोडी प्रकरणी माता पार्वती निवास येथील रहिवासी हरिभाऊ राजाराम गोतरणे यांनी तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी गोतरणे हे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावी पत्नी व मुलींना आणण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ते रहात असलेल्या माता पार्वती या बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घराच्या कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व 23 हजार रुपयांची रोकड असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment