सकल जैन समाजबांधवांचे जळगाव जिल्हाधिका-यांना निवेदन

जळगाव: झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या सम्मेदशिखरजीला झारखंड सरकारने नुकतेच पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. पर्यटनस्थळ जाहीर केल्याने सम्मेदशिखरजीचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सकल जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, अध्यक्ष राजेश जैन, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष ललित पारसनाथ पर्वतराज आणि मधुबन लोडाया, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ यांना जैन तीर्थस्थळ घोषित करण्यात सभाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, प्रवीण यावे, त्याठिकाणी सीआरपीएफ, पगारिया, दिलीप गांधी, स्वरूप लुंकड यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते. 

पारसनाथ पर्वतराज आणि मधुबन यांना जैन तिर्थस्थळ घोषित करण्यात यावे, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन चेकपोस्ट सुरू करण्यात यावे, झाडांची होणारी अवैध कत्तल, दगडांचे उत्खनन व मधासाठी लावण्यात येणाऱ्या आगीच्या घटनांना प्रतिबंध घालावा या मागण्यांचा समावेश जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आहे. देशभरातील जैन समाज बांधवांचे श्री सम्मेद शिखरजी हे अतिशय पवित्र असे तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी जैन धर्मियांच्या २४ तीर्थकरांपैकी २० तीर्थकरांचे निर्वाण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाला अतिशय महत्त्व आहे.

जैन धर्मियांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा देणाच्या अधिसूचनेला विरोध करण्यासाठी बुधवारी जैन बांधवांतर्फे दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. झारखंड सरकारचा निषेध नोंदविला. जैन धर्मियांचे २४ तीर्थंकरांपैकी २० तीर्थकर ज्या पवित्र भूमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यातील मधुबन, जिल्हा गिरडोह येथील महापर्वतराज श्री सम्मेदशिखरजी क्षेत्र हे झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पर्यटन क्षेत्र झाल्यानंतर या पवित्र भूमीमध्ये मांसाहार, हॉटेल व बार दारू विक्री आणि मनोरंजन अशा गोष्टी सुरु होतील की ज्या अहिंसा तत्त्वाच्या विरुद्ध असणार आहेत, असे जैन बांधवांचे म्हणणे आहे.

महावीर दिगंबर जिन चैत्यालयचे यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here