“चार भिंती” चित्र प्रदर्शंनातून पद्मश्री भवरलालजैन यांना आदरांजली

जळगाव दि.23 प्रतिनिधी – येथील पु.ना.गाडगीळ अँड ज्वेलर्स आर्ट गॅलरीत जैन इरिगेशनचेसंस्थापक भवरलाल जैन यांच्या ८५व्या जन्मदिनाला समर्पित असलेल्या “चारभिंती” चित्रप्रदर्शंनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्तेकरण्यात आले होते. या प्रदर्शंनात खानदेशातील ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य राजेंद्रमहाजन, प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर, चित्रकार विकास मल्हारा, चित्रकार विजय जैन यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, प्राणी, फुले, झाडे, माणसे,समाज यांचे प्रतिबिंब याचित्रप्रदर्शंनातून आपल्याला बघता येते, यांसह हे सकारात्मक संदेश देणारे पण आहे असेप्रतिपादन उद्घाटक अशोक जैन यांनी याप्रसंगी केले. या प्रदर्शनाचे प्रास्ताविकशंभू पाटील यांनी केले. पु. ना. गाडगीळचे व्यवस्थापक संदिप पोतदार हे प्रमुख अतिथीहोते. हे प्रदर्शन दिनांक 30 डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्राचार्यएस.एस.राणे, कवी अशोक कोतवाल, अनिल जोशी, दीपक चांदोरकर, चित्रकार पिसुर्वोसुरळकर, श्याम कुमावत, सचिन मुसळे, सुशील चौधरी, तरुण भाटे, जेष्ठ कलाशिक्षक एल. झेड.कोल्हे, जितेंद्र चौधरी, योगेश सुतार, रूपाली सोनवणे, हर्षल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालनज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

या प्रदर्शनातील राजेंद्र महाजन यांनी त्यांच्या चित्रातअंधाऱ्या रात्रीतील डोंगरदऱ्यांमधील भयाण निरवता, त्यांचे बोडखेपणाचाअनुभव मांडलेला आहे. त्यांच्या मनातील अस्वस्थता, तगमग, घुसमट ते या भव्य चित्रात परिणामकारकतेने सादर करत आहे. विकासमल्हारा यांचा पिंड काहीसा अबोल,एकाकीपण स्वीकारलेले  त्यांच्या चित्रात अमूर्त आकारांच्या राखाडीरंग योजनेतून आलेले दिसते. सगळेच आकार एकमेकांतून मिसळत रंगछटांच्या अलवारलेपनातून लय साधतांना दिसतात. त्यांची स्वधाटणीची पॅलेट आहे. उन्हाचे कवडसे, पांढऱ्या रंगाचा संयत वावर, घनदाट अंधार अवकाश, मंद झालेला प्रकाशझोत त्यांच्या या चित्रातूनझळकत राहतो.

प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर हे नेहमीच  सामाजिक व्यथा-वेदना चित्रांत मांडतात, रसिकांना विचारप्रवण करतात. स्त्रीची वासल्यता आणिप्राणीमात्रांची ममता वेगळी नसतेच मुळी; तेच त्यांच्या या चित्रात आलेले दिसते. अनुभवलेल्याजगण्याचा स्त्रोत काहीशा विरुपीकरण आकारांतून यांत ओघानेच बघावयास मिळतो. याचित्रातील घरांचे विखुरलेले आकार आणि स्त्रवलेली उत्कटता हृदयाचा ठाव घेते. चिंतनशीलचित्रकार विजय जैन यांच्या चित्रात ग्रामभाव विश्वातील बैलाची मुख संवेदना, त्यांचा कष्टमय प्रवास काही प्रमाणात अमूर्त आकारात मातीचारंग घेऊन आलेली दिसते.साधारीकरण हा त्यांच्या या चित्राचा स्थायीभाव आहे. याआगळ्या चित्रप्रदर्शंनाला जैन फार्मा फूड फ्रेशचे संचालक अथांग जैन, मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा, ललित कला अकादमी नवी दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेलेहेमंत सूर्यवंशी, जिल्हा कलाध्यापक अध्यक्ष एन. ओ. चौधरी, सचिव अरुण सपकाळे,प्राचार्य अतुल मालखेडे, प्राचार्य जगदीश पाटील, प्रा.संजय नेवे, कलाशिक्षक भिका पाटील, कलाशिक्षक वसंतनागपुरे, कलाशिक्षक वाय.  आर. पाटील,चित्रकार जितेंद्र चौधरी, चित्रकार मनोज जंजाळकर इ.मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here