शासकीय तांत्रीक विद्यालयातील चोरीचा गुन्हा उघडकीस 

On: December 26, 2022 10:29 PM

जळगाव : जळगाव शहरातील जीएस मैदानाजवळ असलेल्या शासकीय तांत्रीक विद्यालयातील संगणक आणि  लेझर प्रिंटरचा चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला आहे.

22 डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेनंतर या विद्यालयाच्या कार्यालयाला लावलेले कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला होता. या घटनेत 20 हजार रुपये किमतीचा संगणक आणि 5 हजार रुपये किमतीचे प्रिंटर चोरी झाले होते. भांडारपाल बाळकृष्ण तुकाराम पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला याप्रकरणी फिर्याद दिली होती.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारे गोपाल हरी जगताप, राहुल लक्ष्मण राजपुत, वाल्मिक नगरातील ऋषीकेश श्रीराम कोळी आणि  खोटे नगरातील शुभम सुनिल तायडे अशा चौघांना या  गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आले  आहे. पोलीस निरीक्षक जयापाल हिरे यांच्या पथकातील स. फो. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, पो.ना. किशोर पाटील, सचिन पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे, विशाल कोळी आदींनी चौघांना ताब्यात घेतले. चौघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment