लग्नाचे आमिष, मंगळसुत्र घालून सेल्फी आणि साखरपुड्यात धमकी

On: December 27, 2022 10:32 AM

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला त्रास देणा-या विवाहीत तरुणाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहू ता. पारोळा येथील तरुणाविरुद्ध सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या गावापासून जवळच रहात असलेल्या  विवाहीत तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. मी माझ्या पत्नीला फारकती देवून तुझ्यासोबत लग्न करेन असे संबंधीत तरुणीला त्याने आमिष दाखवले. तिच्या गळ्यात मंगळसुत्र घालून सेल्फी काढली. तरुणीचा साखरपुडा असलेल्या दिवशी तो तिच्याजवळ गेला. मंगळसुत्र घालतांना काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणीसह तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली. तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिल्याने तरुणी घाबरली.

तरुणीने म्हटल्यानुसार दुस-या  दिवशी ती अंगणात झाडू मारत असतांना तो तरुण तिच्याजवळ आला. तिचा हात पकडून त्याने तिला जवळ ओढले. दरम्यान तिचे नातेवाईक त्याठिकाणी आले. त्या नातेवाईकांनी त्याला खडसावले असता त्यांना शिवीगाळ करत  जीवे ठार  करण्याची धमकी दिल्याचे तरुणीने म्हटले आहे. या  गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. सुधीर चौधरी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment