जळगाव : आपल्या नावाचा गैरवापर होत असून बनावट सहीने शासकीय कार्यालयात माहिती मागीतली जात असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. काही असंतुष्ट घटक आपल्या नावासह बनावट सहीने माहितीची मागणी करत असल्याचा प्रकार वेळोवेळी उघड झाला असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी क्राईम दुनिया सोबत बोलतांना म्हटले आहे.
दीपककुमार गुप्ता हे गेल्या अनेक वर्षापासून सामजिक व माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत आहे. प्रशासनाकडून न्याय मिळत नसलेले सामान्य लोक त्यांच्या विविध समस्या दीपककुमार गुप्ता यांच्याकडे लेखी अथवा मौखीक स्वरुपात घेवून येत असतात. प्रशासनासोबत संवाद साधून गुप्ता जनतेच्या तक्रारींचे निवारण करत असतात. काही प्रसंगात बरेचसे अधिकारी व असामाजिक तत्व गुप्ता यांच्याकडून दुखावले जाण्याचा प्रकार घडत असतो.
काही असामाजीक तत्व आपल्या नावाचा गैरवापर करुन बनावट सहीने शासकीय कार्यालयात माहिती मागून निर्माण झालेले वैर काढण्याचा प्रकार करत असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. असा प्रकार यापुर्वी देखील आपल्या अनुभवास आला असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. परिणामी अशा अर्जामुळे विनाकारण बरेच अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य जनतेच्या मनात आपल्याविषयी कलह आणि दुषित भावना तयार होत असल्याचे गुप्ता यांनी पुढे बोलतांना म्हटले आहे.
विविध शासकीय/अर्ध शासकीय व अशासकीय कार्यालयात आपल्या नावाने कोणताही माहिती मागणीचा अर्ज आल्यास अथवा त्यावर कारवाई करण्यापुर्वी शहानिशा करण्याचे गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. मोबाईल क्रमांक 9890809030 किवा [email protected] वर संपर्क करुन खात्री करण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.