बळजबरी बालविवाह – तिघांविरुद्ध गुन्हा

On: December 28, 2022 10:35 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीचा बळजबरी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर आणि अशोक दिलीप पाटील (सर्व रा. दसनूर ता. रावेर जिल्हा जळगाव) अशी  गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

अंबरनाथ – ठाणे परिसरातील सतरा वर्षाच्या मुलीने या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. आपण अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना आपले बळजबरी लग्न लावून दिल्याचे संबंधीत मुलीने म्हटले आहे. गेल्या महिन्यात 6 नोव्हेंबर रोजी हा  विवाह लावून देण्यात आला होता. हे.कॉ. विजय पोहेकर पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment