आजचे राशी भविष्य (29/1/2023)

आजचे राशी भविष्य (29/1/2023)

मेष : बेरोजगारांना चांगली बातमी मिळू शकते. बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावे.

वृषभ : कर्जमुक्तीसाठी प्रयत्नशील रहावे. जोखीम पत्करून कोणतीही गुंतवणूक करु नका.

मिथुन : घरामधील प्रलंबीत कामे उरकण्याचा प्रयत्न करा. मिळकतीचे नविन स्रोत मिळण्याची शक्यता.

कर्क : समोरची व्यक्ती आपला निर्णय मान्य करेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल.

सिंह : कामे मार्गी लागल्याने कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकुल होईल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

कन्या : व्यवसायात चलती दिसून येईल. आहारात पथ्यपाणी पाळा.

तुळ : शांतचित्ताने कामे करा. निश्चयाने काम हाती घेतल्यास निश्चितच यश मिळेल.

वृश्चिक : प्रत्येक कामात सावध भूमिका घ्याल. कौटुंबिक खर्च चिंतेत भर पडू शकते. कामाचे कौतुक होईल.

धनु : सध्या प्रतिकुल काळ आहे. त्यामुळे डोळे झाकून कोणताही निर्णय घेवू नका.

मकर : चूक झाल्यास मान्य करा. आप्तेष्टांशी असलेले नातेसंबंध वृद्धींगत होतील.

कुंभ : मित्रांसमवेत फिरायला जाण्याची योजना आखाल. सरकारी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता.

मीन : अस्थिरतेमुळे मन विचलीत होण्याची शक्यता आहे. बोलतांना विचार पक्के ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here